भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उदघाटन गुरुवार, 13 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहात झाले.
यांची होती उपस्थिती
उद्घाटक म्हणून अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाचवे प्राचार्य डॉ.आर.के.नारखेडे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी व विज्ञान मंडळ प्रमुख डॉ.सी. एच. सरोदे उपस्थित होते.





समस्यांवर विज्ञान व तंत्रज्ञानातून उपाय
प्राचार्य डॉ.आर.के.नारखेडे यांनी पर्यावरण संवर्धनावर मार्गदर्शन केले तसेच वाढते प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा वाढता वापर आणि पाणीटंचाई या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकला. या समस्यांवर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी उपाय शोधता येतात, असे त्यांनी सांगितले. सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या उपायांचा अवलंब करण्याचे व विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरणीय समस्य गंभीर : प्राचार्य
प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे म्हणाले की, विज्ञानाने मानवी जीवन अधिक सुखकर केले असले, तरी वाढते प्रदूषण, वृक्षतोड, पाणीटंचाई आणि प्लास्टिकचा वाढता वापर या मुळे पर्यावरणीय समस्या गंभीर होत आहेत. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपण, पाणी बचत आणि प्लास्टिकमुक्त परिसर यांसारख्या उपक्रमांत सहभागी व्हावे.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्रास्ताविक विज्ञान मंडळ प्रमुख डॉ.सी.एच.सरोदे तर आभार प्रा.डॉ.जी.एम.पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.व्ही.ए.पाटील, प्रा.डॉ. जी.एम.पाटील, प्रा.डॉ.एस.डी.येवले, प्रा.डॉ.व्ही.एन.महिरे, प्रा.डॉ.यू.ए. फेगडे, प्रा.डॉ.एच.व्ही.पाटील, प्रा.डॉ.एस.एस.कोलते, प्रा.डॉ.एन.एस. पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षेकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.