संभाजीनगरात आई-वडीलांसह मुलाचा टेकडीवरून कोसळून मृत्यू : मुलाने टोकाचे पाऊल उचलले वेगळ्याच कारणातून…!
छत्रपती संभाजीनगर (शनिवार, 22 ऑगस्ट 2026) : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या मुलाला वाचवताना पडून वडिलांचा मृत्यू झाला तर पतीसह मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून हताश आईनेदेखील उडी घेत जीवन संपवले. काळीज पिळवटून टाकणार्या या घटनेमागे सुरूवातीला मुलाने आयफोनसाठी हट्ट धरल्याचे सांगितले जात होते मात्र पोलिसांच्या तपासात हा प्रकार वेगळाच असल्याचे समोर आले आहे. आयफोन हे आत्महत्येचं कारण असल्याचं प्राथमिक तपासात दिसत नाही, असं डीसीपी रत्नाकर नवले यांनी स्पष्ट करीत कुणाल तणावात होता, असंही त्यांनी म्हटले आहे.
प्रत्यक्षदर्शीनुसार आयफोन कारण नाहीच
माजी सरपंच संजय जाधव यांनी माध्यमांना सांगितले की, घटनास्थळी ते कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांनी, तुझ्याकडे आयफोन आहे, आई-वडील तुझे किती लाड करतात, अशा शब्दांत कुणालला समजावून सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कुणालला आयफोन हवा होता आणि त्यासाठीच त्याने टोकाचे पाऊल उचलले, अशी कोणतीही चर्चा घटनास्थळी झाली नव्हती, असे संजय जाधव यांनी स्पष्ट केले त्यामुळे आयफोन हे आत्महत्येचे कारण असल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी झाली नव्हती.
मुलगा तणावात होता पण
पोलिसांना 112 नंबरवर घटनेची माहिती मिळाली होती. आम्ही गेलो तेव्हा काही स्थानिक नागरिक तिथं होते. अग्निशामक दलाला बोलावण्यात आले तर अॅम्ब्युलन्सला देखील बोलवण्यात आले. पोलिसांकडून सर्व प्रयत्न केले गेले अन् दुर्देवी घटना घडली. मुलगा तणावात होता, पण मुलाने आयफोनमुळे आत्महत्या केली असं प्राथमिक तपासात अद्यापतरी समोर आलं नाही, असंही डीसीपी रत्नाकर नवले यांनी म्हटलं आहे.
रर्वींशीींळीशाशपीं
कुटूंबातील कुणीही जिवंत नाही
तपास प्राथमिक टप्प्यावर आहे यामुळे खात्रीशीरपणे यावर कारण सांगितलं जाऊ शकत नाही. तसापाअंती याचं कारण स्पष्ट होईल. तरुणाच्या कुटूंबात काय वाद झाला होता, हे सांगण्यासाठी त्यातील कुणीही जिवंत नाही त्यामुळे नेमकं काय घडलं? हे जाणून घेण्यासाठी वेळ लागेल. घटनेवरून असं वाटत होतं की कुणाल तणावात होता. लोक त्याला सर्व गोष्टी विचारत होते. त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत होते, असंही डीसीपी रत्नाकर नवले यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
जीव वाचवताना कुटूंबच संपले
कुणाल डोंगरावर असताना अग्निशमन दलाने जाळी लावून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र कुणाल वारंवार जागा बदलत होता. मुलाला वाचवण्यासाठी आईनेही शर्थीचे प्रयत्न केले. मी वडिलांना सोडते, आपण दोघे वेगळे राहू, त्यांच्यासोबत राहणार नाही, असे सांगत आईनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कुणाल कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले. कुणालला वाचवण्यासाठी आई-वडिलांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्दैवाने आई आणि वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबावरच काळाचा घाला घातला गेला.


