यावल तालुका कृषी अधिकार्यांचा हृदयविकाराने मृत्यू
यावल (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : यावल शहरातील तडवी कॉलनी भागातील रहिवासी तथा तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांचा शनिवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वारे यांचे पार्थिव अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी नेण्यात येत असून तेथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
हृदयविकाराने निधन
शहरातील विस्तारीत भागातील तडवी कॉलनीत रहिवासास असलेले व यावल तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत भरत वामन वारे (52) यांना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास छातीत दुखायला लागताच त्यांना डॉ.धीरज चौधरी यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले असता दवाखान्याचा जीना चढत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जीन्यावरून खाली कोसळले. नागरिकांनी तातडीने डॉक्टरांना माहिती दिली मात्र उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.


