जळगावातील शनिपेठ पोलिसांची कारवाई : मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा 12 तासांत उघडकीस


जळगाव (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : शहरातील योगेश्वर नगर परिसरातील गजानन पार्क येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा शनिपेठ पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उघडकीस आणला. या कारवाईत चंद्रकांत भागवत पाटील (रा. दशरथ नगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपींकडून 12 हजार 550 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

काय घडले जळगावात ?
रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. शनिपेठ पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना पथकाला दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय यंत्रणेद्वारे चंद्रकांत भागवत पाटील तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून 12 हजार 550 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तपास हवालदार अनिल साबळे करीत आहेत.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, परिवेक्षाधीन उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, हवालदार विजय खैरे, हवालदार योगेश जाधव, हवालदार अनिल साळुंखे, पराग दुसाणे, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे, नवजीत चौधरी, सीसीटीव्ही विश्लेषक मुबारक देशमुख आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !