जळगावात कंत्राटी वीज कामगाराचा शॉक लागून मृत्यू


जळगाव (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : जळगावात वीज दुरुस्तीदरम्यान शॉक लागल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी जळगाव शहरातील विमानतळ रोड परिसरात घडली. महेश देविदास अपार (35) असे मृताचे नाव आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अचानक सुरू झाला वीज प्रवाह
महेश अपार हे विमानतळ रोड परिसरात विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढले होते. काम सुरू असतानाच अचानक तारांमध्ये वीजप्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते खांबावरून थेट रस्त्यावर कोसळताच त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महेश यांच्या मृत्यूची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.

दरम्यान, दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणकडून रीतसर एलटी/एचटी परमिट घेण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असताना अचानक वीजप्रवाह सुरू कसा झाला? असा सवाल मृताच्या नातेवाईकांसह सहकार्‍यांनी उपस्थित केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !