लोंढवे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने जानवे आरोग्य केंद्रातील वाहन चालक ठार
अमळनेर (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : लोंढवे फाट्याजवळ हॉटेल रुद्राक्षी परिसरात अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवार, 28 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन हिरामण लोखंडे (रा.राजे संभाजी नगर) असे मृताचे आहे.
अज्ञात वाहनाने दिली धडक
लोखंडे हे दुचाकी (क्रमांक एम.एच.54 ए.4868) वरून जात असताना लोंढवे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर ते वाहनासह रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही करण्यात आली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
