स्व.हरीभाऊंच्या निधनाने सहकार क्षेत्राची हानी : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : भाजप नेते हरिभाऊ जावळे यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. देशाची संसद आणि राज्याच्या विधीमंडळात प्रतिनिधीत्व केलेल्या, सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या त्यांच्यासारख्या नेतृत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जावळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
