स्व.हरीभाऊ जावळे यांच्या रूपाने अजातशत्रू शेतकरी नेत्याला गमावले


पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली भावना

मुंबई : माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ जावळे यांच्या निधनामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, राजकारणातील अजातशत्रू नेतृत्व जळगाव जिल्ह्याने गमावले असून ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही, अशी भावना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी हरीभाऊ जावळे यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे.

लोकसभा व विधानसभेत कामाचा ठसा उमटवला
शोकसंदेशात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, हरीभाऊ जावळे यांच्या निधनाने मनाला वेदना झाल्या. एक शांत , सुस्वभावी, अजातशत्रू व सोज्वळ नेता म्हणून हरीभाऊ कायम स्मरणात राहतील. लोकाभिमुख, केळी उत्पादक शेतकर्‍यांसाठी ते नेहमीच काम करत राहिले. विधानसभा आणि लोकसभेत जिल्ह्याचे नेतृत्व करताना आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटविला. त्यांच्या निधनाने जळगाव जिल्ह्याची मोठी हानी झाली असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !