जळगावात उधारीने सिगारेट न दिल्याने कोयत्याने हल्ला : त्रिकूटाला अटक

जळगाव एमआयडीसी पोलिसांची 12 तासांत कारवाई


जळगाव (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ उधारीत सिगारेट न दिल्याच्या वादातून 41 वर्षीय प्रौढावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी त्रिकूटाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ तक्रारदार किशोर माधवराव बाविस्कर (41, शिवनगर खेडी बु.॥) या भंगार व पान व्यावसायीकाने उधारीत सिगारेट न दिल्याच्या वादातून एका अल्पवयीनासह अन्य तीन संशयीतांनी शिविगाळ करीत ठार मारण्याची धमकी देत शिविगाळ केली तसेच तलवार व कोयत्यांनी आरोपींनी हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक
एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आनंद हरी पाटील (24), हर्षल रवींद्र शिंदे (20) व गौरव विनोद पाटील (20, सर्व रा.खेडी, ता.जळगाव) यांना अटक केली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, हवालदार रामकृष्ण पाटील, नाईक प्रदीप चौधरी, हवालदार संजीव मोरे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, किरण पाटील, राहुल घेटे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे, सुभाष साबळे, राहुल पाटील आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !