भुसावळात कोळी समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात 280 इच्छूकांनी दिला परिचय

विवाह इच्छुकांना जोडीदार निवडण्यासाठी मिळाले व्यासपीठ


भुसावळ (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : कोळी समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कोळी समाज विकास मंडळाच्या वतीने रविवार, 15 रोजी गजानन महाराज नगरातील कोळी मंगल सभागृहात राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात राज्यभरातून आलेल्या 172 उपवधू तर तर 108 उपवरांनी परिचय करून दिला.

यांची होती उपस्थिती
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय वधू-वर परिचय समितीचे अध्यक्ष संदीप कोळी होते. प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव मोंढे, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगावचे माजी समाज कल्याण सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे, रमेश सोनवणे, यावलचे प्रभाकरआप्पा सोनवणे, विश्वनाथ तायडे, पन्नालाल सोनवणे, भिकाभाऊ सोनवणे, सुधाकर कोळी आणि भीमराज कोळी उपस्थित होते.

उपवर वधूंनी दिला परिचय
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर परिचय मेळाव्याला सुरुवात झाली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विवाह इच्छुक युवक-युवतींनी व्यासपीठावरून स्वतःचा परिचय देत शैक्षणिक पात्रता, व्यवसाय आणि कौटुंबिक माहिती उपस्थित पालकांसमोर मांडली.

बदलत्या काळात मेळावा गरजेचा
अध्यक्ष संदीप कोळी यांनी कोळी समाज विकास मंडळाच्या विविध उपक्रमांची आणि कार्याची माहिती दिली. समाजातील युवक-युवतींना विवाहासाठी योग्य व्यासपीठ मिळावे आणि समाजातील कुटुंबांमध्ये परस्पर संवाद वाढावा, या दृष्टीने अशा मेळाव्यांचे महत्त्व त्यांनी विषद केले. सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी तर प्रदीप सपकाळे यांनी आभार मानले.

मेळावा यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, दीपक सोनवणे, शांताराम कोळी, रवींद्र बाविस्कर, प्रदीप सपकाळे, महारू कोळी, भागवत सपकाळे, वसंत सपकाळे, दत्तात्रय सपकाळे, गोकुळ सपकाळे, विजय रायपुरे, अनिल सोनवणे, चंद्रकांत सपकाळे, मनोज सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, धर्मराज कोळी, उत्तम कोळी, सोपान पवार, नारायण कोळी, विजय तावडे, दिलीप सोनवणे, पवन सोनवणे, कैलास सोनवणे, आनंदा दोळे यांच्यासह वंदना कोळी, ज्योती सोनवणे, इंदुबाई तावडे, सीमा सूर्यवंशी, सुकेशा बाविस्कर, विद्या बाविस्कर, संजीवनी भोलणकर, सिंधुबाई सपकाळे, वत्सला रायपुरे आणि सीमा कोळी यांच्यासह समाजबांधव व महिलांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !