अमळनेर तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक : दोन डंपर जप्तीने खळबळ


अमळनेर (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026)  अमळनेर तालुक्यातून अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणारे दोन डंपर ढेकू रस्ता आणि लोंढवे फाट्यावर पकडून महसूल पथकाने कारवाई केली. उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, तहसीलदार डॉ.उमा ढेकळे यांनी तालुक्यातील वाढती गौण खनिज वाहतूक व चोरी रोखण्यासाठी रात्रीचे गस्त पथक नेमले आहेत.

27 रोजी पहाटे धुळे रस्त्यावर लोढवे फाट्यावर गोपाळ रवीन्द्र पाटील यांचे डंपर (एम.एच.48 ए.जी.7601) हे अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करताना आढळल्याने ते जप्त करण्यात आले. डंपरसह मुद्देमाल रेतीसह अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. महसूल पथकात

वावडे मंडळाधिकारी पी.एस.पाटील, मांडळ ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी, जैतपीर ग्राम महसूल अधिकारी एम.आर.पाटील, बोहरा ग्राममहसूल अधिकारी भूषण पाटील, डांगर बु.॥ महसूल अधिकारी दीपक पाटील, ब्राह्मणे ग्राम महसूल अधिकारी विकेश भोई, शहापूरचे ग्राम महसूल अधिकारी विक्रम कदम, रणाईचे ग्राम महसूल अधिकारी कल्पेश कुवर, धार ग्राम महसूल अधिकारी भूषण बाविस्कर, करणखेडे ग्राम महसूल अधिकारी सचिन बमनाथ, जुनोने ग्राम महसूल अधिकारी जी.व्ही.पावरा यांचा समावेश होता.

दरम्यान, अमळनेर-ढेकु रस्त्यावर इंडियन गॅस गोडाऊनजवळ डंपर (क्रमांक एम.एच.14 एम.एच.5924) हे अवैधरित्या रेती वाहतूक करताना आढळल्योन जप्त करण्यात आले. हे डंपर अमळनेर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !