देशात आता वन नेशन वन रेशनकार्ड : पंतप्रधान नरेंद्र मोदी
गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरू ठेवण्याची केली मोठी घोषणा
नवी दिल्ली : गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरू राहणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करीत संपूर्ण भारतासाठी ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ असणार असल्याचे सांगत देशवासीयांना मोठा दिलासा दिला. पंतप्रधानांनी देशातील नागरीकांशी मंगळवारी संवाद साधला.
नियमांचे पालन गरजेचे
पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. देशाचा पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना नियम एकसारखे आहेत. पावसाळा आला असल्याने स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन नागरीकांनी योग्य पद्धतीने केल्याने भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. राज्य सरकार, देशातील नागरीक आणि संस्थांनी अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले. गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी गरीब कुटुंबाच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. या काळात 9 हजाराहून अधिक शेतकर्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी जमा झाले असल्याचे ते म्हणाले.


