यावल शहरवासीयांना होणार शुद्ध पाण्याचा पुरवठा


जलशुद्धीकरण केंद्राच्या कामास सुरुवात

यावल : यावल नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामास गेल्या आठवड्यात सुरुवात झालेली असून त्या कामाची नगराध्यक्षा नौशाद तडवी यांच्यासह नगरसेवकांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. नगरपरीषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एकूण 60 लक्ष रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यापूर्वी देखील जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र त्यामध्ये फक्त साचलेला गाळ काढणे एव्हढीच कामे करण्यात आली होती. आता मात्र केंद्रामध्ये असलेल्या चार टप्प्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये गोटे बदलण्यात येणार असून त्यामध्ये मिक्सरसारखे चार फाक्यूलेटर बसविण्यात येणार आहे व दुसर्‍या टप्प्यामध्ये नवीन ट्यूब सेंटलर व तिसर्‍या टप्प्यामध्ये पाईप सेट कलर बसविण्यात येणार असून त्यानंतर चौथ्या टप्प्यातील फिल्टर मोडमध्ये गोधरा येथील नदीची वाळू वापरण्यात येणार आहे.

यांची होती उपस्थिती
कोकोनट सेल देखील वापरण्यात येणार आहे त्यामुळे शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. या कामाची नगराध्यक्षा नौशाद तडवी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते आदींनी पाहणी केली. यावेळी राजेंद्र फालक, गणेश महाजन, पाणीपुरवठा अभियंता मोरे, बांधकाम अभियंता योगेश मदने व शिवानंद कानडे यांनी आदींची उपस्थिती होती.

जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्जीवन : अतुल पाटील
जल शुद्धीकरण केंद्राची निर्मिती 1994 मध्ये करण्यात आली होती तेव्हापासून तर आजपर्यंत फक्त गाळ काढणे एवढीच कामे करण्यात आले मात्र आता संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णपणे नव्याने होणार असल्याने व त्यामध्ये नवीन तंत्रानुसार दुरुस्ती होणार असल्याने या जलशुद्धीकरण केंद्राचे पुनर्जीवन झालेले आहे. भविष्यात 20 वर्ष तरी केंद्राची दुरुस्तीची गरज पडणार नाही, असे काम हाती घेतले आहे यामुळे शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा गटनेता अतुल पाटील यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !