राकाँ जिल्हा सरचिटणीसपदी प्रशांत पाटील
यावल : तालुक्यातील गिरडगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भीमराव पाटील यांची पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांनी ही निवड केली. पाटील यांना दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की, गतकाळात पक्षसंघटना बळकटीसाठी आपण केलेल्या कार्याचा तपाशिल पाहता आपली जिल्हा सरचिटणीसपदी पुनश्च फेरनिवड करण्यात येत असून भविष्यात पक्षसंघटनंची बांधणी अधिक जोमाने करावी. निवडीबद्दल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, युवक अध्यक्ष अॅड.देवकांत बाजीराव पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दिनकर सीताराम पाटील, राज कोळी यांनी त्यांचे अभीनंदन केले.

