शासनाने महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे
भुसावळ तालुका बहुजन मुक्ति पार्टी महिला आघाडीची शासनाकडे मागणी
भुसावळ : शासनाने महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी भुसावळ तालुका बहुजन मुक्ति पार्टी महिला आघाडीतर्फे तहसीलदार दीपक धीवरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाचा आशय असा की, केंद्र सरकारने कोरोना काळात देशातील उद्योगपतींचे 65 हजार करोडे रुपयांचे कर्ज माफ केले, त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाने सलग दोन वर्ष शेतकरी कर्जमाफी केली याच धरतीवर कोरोना काळात रोजगार नसल्याने उत्पन्नही हाती नसल्याने या अनुषंगाने बचत गटांचेही कर्ज माफ करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. बचत गटांना कर्ज पुरवठा करणार्या मायक्रो फायनान्स प्रायवेट बँका हप्ते भरण्यासाठी सातत्याने तगादा लावत आहेत मात्र उत्पन्न नसल्याने महिला कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ असल्याने शासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आली.
निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देताना कल्पना गयभु पाटील, संगीता अमृत सोनवणे, शकुंतला जैन, अमीषा तायडे, यमुना शांताराम शेळके, लक्ष्मी वसंत जनवरीया, अनिता अमृत बोदडे, नंदा सोनवणे, कल्पना मस्के यांची उपस्थिती होती तर तहसीलदारांना वरीष्ठ कार्यकर्ते हारून मन्सुरी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष बालकृष्ण सोनवणे तसेच सरोज रविन्द्र वाघ आदींचीही उपस्थिती होती.

