भुसावळात भाजपा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा सत्कार
भुसावळ : भारतीय जनता पार्टीचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश दामु भोळे यांनी शनिवारी भुसावळ येथील आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी आमदार सावकारे व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आमदार राजुमामा भोळे यांचे आमदार सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी स्वागत केले. प्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस अमोल महाजन, पवन बुंदेले, नगरसेवक अमोल इंगळे, निक्की बत्रा, गिरीष महाजन, परीक्षीत बर्हाटे, अनिरुद्ध कुलकर्णी, पुरुषोत्तम नारखेडे, अजय नागराणी, प्रशांत नरवाडे, रमाशंकर दुबे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

