भुसावळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन


भुसावळ : शहरातील माता रमाबाई आंबेडकर नगरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ शहर काँग्रेस अनु जाती विभागाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, उत्तर महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर उपस्थितांना संबोधीत केले. यावेळी काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय तुरकेले, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, काँग्रेस असंघटीत कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.शरद तायडे, शहराध्यक्ष अ‍ॅड.रमू पटेल, विक्रम वानखेडे, अनिल मोरे तसेच वॉर्डातील नागरीक उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !