राममंदिर भूमिपूजनासाठी छत्रपतींच्या जन्मस्थानाची पवित्र माती वापरावी


शिशिर जावळे यांची पंतप्रधान मोदीजी व श्रीराम मंदिर ट्रस्टकडे मागणी

भुसावळ : 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या येथे राममंदिराचे भूमी पूजन होणार असून देशभरातून आनंद आणि हर्षोल्हासित वातावरणात हजारो पवित्र स्थळांची पवित्र माती तसेच पवित्र नद्यांचे पाणी हे श्रीराम जन्मभूमीच्या पूजनासाठी पाठविले जात आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर येथे राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय स्वाभिमान व सामाजिक समरसतेचे दर्शन घडणार असून या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र जन्मस्थळ महू येथील माती सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उगमस्थान नागपूर, संत रविदास यांचे काशी येथील जन्मस्थान, सीतामढी येथील वाल्मिकी आश्रम, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातले कचारगड, झारखंड येथील रामरेखाधाम, मध्यप्रदेशातील तंट्या भिल्लाची पुण्यभूमी, श्री हरमंदिर साहिब अमृतसर, दिल्ली येथील जैन लाल मंदिर त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी जिथे 72 दिवस वास्तव्य केले ते वाल्मिकी मंदिर ही त्यातील काही पवित्र स्थळांवरून पवित्र माती येणार आहे. स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांनी जीवाचं रान केले अशा थोर रयतेचा राजा युगपुरुष छत्रपती शिवाजी यांचे जन्मस्थळ असणार्‍या पवित्र शिवनेरी गडावरील माती सुद्धा अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर भूमिपुजन सोहळ्यास वापरावी, अशी मागणी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष शिशिर जावळे यांनी अयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, उत्तर प्रदेशखे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !