मुंबई-हावडा मेल विशेष गाडी शॉर्ट टर्मिनेट
भुसावळ : पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे मुंबई-हावडा मेल ही राउलकेला स्टेशनपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. डाऊन 02809 मुंबई-हावडा मेल विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनहुन 14 ऑगस्ट व 21 ऑग्स्ट रोजी राउलकेला पर्यंतच जाणार असून हावडा स्टेशनपर्यंत ती जाणार नाही. अप 02810 हावडा-मुंबई मेल विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनहुन 5 ऑगस्ट रोजी हावडा स्टेशन ऐवजी राउलकेला स्टेशनहुन आपल्या वेळेत प्रस्थान करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

