कोरोना योद्ध्यांच्या हातून आमदार चंद्रकांत पाटलांनी बांधली राखी


मुक्ताईनगर : भावा-बहिणीच्या अतुल प्रेमाचा असलेला रक्षा बंधन सण आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोना योद्ध्यांसोबत साजरा केला. यंदा देशावर कोरोना महामारीचे सावट असल्याने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे व देशभरातील दळणवळण बंद असल्याने बहिणीला माहेराचे व भावाचे दर्शन दुर्लभ झाले आहे. अशात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी हा सण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करीत बहिण-भावाच्या नात्याचं अतिशय सुंदर उदाहरण त्यांनी तरुणाई व समाजासमोर ठेवले आहे.

कोरोना योद्ध्यांच्या हातून बांधली राखी
आमदार पाटील यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांसह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरला भेट देत 30 महिला डॉक्टर्स व नर्स या खर्‍या खुर्‍या कोरोना वॉरीयर्ससोबत रक्षाबंधन सण साजरा केला. मुक्ताईनगरच्या भूमीला संत मुक्ताई व संत ज्ञानेश्वरांच्या अतूट भाऊ-बहिणीच्या नात्याची परंपरा आहे. ही परंपरा शिवसेनेच्या वतीने दरवर्षी जोपासली जाते व या अनुषंगाने संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थिनीसोबत रक्षाबंधन उत्सव साजरा केला जातो परंतु कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय बंदच पडलेले असल्याने या विद्यार्थीनींना मनापासून शुभेच्छा देत त्यांनी घरीच सुरक्षित रहावे, असा संदेश शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे . दुसरीकडे कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्था कामाला लागली आहे त्यामुळे अनेकांना रक्षाबंधन साजरा करता येणार नाही त्यातच महिला डॉक्टर्स, नर्सेस सफाई कामगार हे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपली रक्षा करीत आहे त्यामुळे आपली रक्षा करणार्‍या बहिणींसोबत यंदाचे रक्षाबंधन साजरी करायचा, असा निश्चय करून आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. उपजिल्हा रुग्णालयात व कोविड केअर सेंटरला पोहोचताच महिला डॉक्टर्स व नर्सेस यांनी त्यांचे अतिशय आनंदात स्वागत केले .

साडी,चोळी व सॅनेटायझरची भेट
30 कोरोना वॉरीयर्स डॉक्टर्स व नर्सेस भगिनींना ओवाळणीच्या स्वरूपात साडी, चोळी व सॅनेटायझरची भेट आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, अ‍ॅड. मनोहर खैरनार, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर संघटक वसंत भलभले, शहरप्रमुख गणेश टोंगे, गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, पिंटू पाटील, राजेंद्र तळेले, युवा सेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, तालुकाप्रमुख पंकज राणे, हरी माळी, निलेश घुले, हारून शेख, कलिम मणियार, शेख गयास, तानाजी पाटील, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, संतोष माळी, मनोज मराठे आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !