आनंदी जीवन जगण्यासाठी मन खुले ठेवा : डॉ.दत्ता कोहिनकर


भुसावळ : धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस स्वतः सोबतच कुटुंबालादेखील विसरून जातो वेळेअभावी व ताणतणावामुळे विविध आजारांनी ग्रासले जातात यामधूनच नकारात्मक भूमिका तयार होते तसेच मन विचलित होऊन स्वभावात बदल होत असतोए मन वैतागतेए त्रस्त होते याकरीता मन खुले ठेवा म्हणजे आनंदी जीवनाचा आस्वाद सर्वांना घेता येईल, अशा प्रकारचे आवाहन माईंड पॉवर ट्रेनर तथा विचारवंत दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली यांच्यावतीने कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणापासून काही वेळ बाजूला होऊन कौटुंबिक आनंदी वातावरण ठेवण्यासाठी द्वंद जीवनाचे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

चांगल्या गोष्टींचा विचार करा
प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे यांनी करताना सांगितले की,रोटरीच्या माध्यमातून या शाळा बंद कालावधीमध्ये हे आनंददायी व विचाराला चालना देणारे विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून लवकरच याची सुरुवात करणार आहे. चौथे पुष्प गुंफताना पुणे येथील विचारवंत लेखक तथा माईंड पॉवर ट्रेनर डॉ.दत्ता कोहिनकर म्हणाले की मनाच्या दोन बाजू आहेत एक बाह्यमन आणि दुसरे अंतर्मन बाह्यमन दहा टक्के काम करते तर अंतर्मन 90 टक्के काम करत असते यामुळे विचार करताना कृती करताना, आजूबाजूला बघतांना चांगल्या गोष्टींचा विचार करा यामुळे अंतर्मन देखील सकारात्मक राहते व यामुळे विचारांमध्ये बदल घडतो, सकारात्मक कृती करण्याची सवय जडते नकारात्मक विचार केला तर जीवन देखील नकारात्मक होत असते ताण कमी करण्यासाठी काही छोट्या-छोट्या कृती करा यामध्ये तोंडात लाळ तयार करून गिळून घ्या, हाताच्या अंगठ्याने डोक्यावरती मध्यभागी दाब द्या, लहान मुलांसोबत खेळा, आनंदात घालवलेले क्षण आठवा, हाताची बोटे ताणा, लहान मुलांसोबत खेळा, मुलांशी संवाद साधा, त्यांच्या भावना समजून घ्या यामुळे आपला ताण नक्कीच कमी होईल.

स्वतःवर प्रेम करतो, म्हणा
डॉ.दत्ता कोहिनकर म्हणाले की, दररोज सकाळी उठल्यानंतर आरशासमोर उभे राहून मी स्वतःवर प्रेम करतो, असे म्हणा तसेच दहाच्या पटीत टाळ्या वाजवा यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण संस्था कार्यान्वित होते आणि हृदयविकारासारख्या आजारापासून आपण लांब राहू शकतो. याचे उदाहरण त्यांनी सांगितले की, तृतीयपंथी व्यक्ती हृदयविकाराने मयत झाले अशी घटना आपण कधी ऐकले नाही त्याच्या मागील शास्त्रीय कारण म्हणजे टाळ्या वाजवणे. डॉ.दत्ता कोहिनकर यांचा परीचय व व्याख्यान वरील श्रोत्यांनी लिहिलेल्या कवितांचे वाचन प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे व प्रदीप सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जीवन महाजन यांनी मानले.

सोळा हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला कार्यक्रम
व्याख्यानमाला ही ऑनलाईन झूम अ‍ॅपद्वारे घेण्यात येऊन त्याचे प्रसारण रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ या फेसबुक पेज वरून लाईव्ह करण्यात आले. या ठिकाणी सोळा हजारांपेक्षा जास्त नागरीकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !