भुसावळच्या अनिकेत सचानने युपीएससी परीक्षेत पहिल्यात प्रयत्नात मिळवले यश


भुसावळ : शहरातील रहिवासी असलेल्या अनिकेत सचान या विद्यार्थ्याने वयाच्या 22 व्या वर्षीच पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत 285 वा क्रमांक मिळवून बाजी मारली आहे. अनिकेतचे शिक्षण भुसावळ येथील केंद्रीय विद्यालयात झाले असून त्याने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के तर इयत्ता 12 वीत 96.2 टक्के गुण मिळवले होते. पहिल्याच प्रयत्नात त्याने आईआईटी वाराणसी येथे इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागात त्याला प्रवेश मिळाला होता तर महाविद्यालयीन शिक्षणासह तो यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. अनिकेतचे वडील विनयकुमार सचान हे भुसावळ रेल्वे स्थानकावर मुख्य तिकीट निरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याची आई मंजुषा सचान या गृहिणी असून बहिण आयुषी एम्स, दिल्ली येथून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. या यशाचे श्रेय अनिकेतने आपल्या परीश्रमासह आई, वडील, नातेवाईक, शिक्षक, मित्र व परीवाराला दिले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !