भुसावळात देशी दारूची अवैध विक्री : एकाला अटक
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील कृष्णानगर समोरील डेअरी परिसरात अवैधपणे, देशी-विदेशी दारूची विक्री करणार्या संशयीताला बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून दोन हजार 496 रुपयांचा मद्यसाठा करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई झाली. प्रमोद प्रकाश धांडे (रा.कृष्णानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बाजारपेठचे पोलिस कर्मचारी नीलेश बाविस्कर, रवींद्र बिर्हाडे, महेश चौधरी, रमण सुरळकर, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी यांनी ही कारवाई केली.

