जामुनझिरा येथे चुलत बहिणीवरच अत्याचार : एकाविरुद्ध गुन्हा


यावल : केळी देण्याच्या आमिषाने सहा वर्षीय अल्पवयीन असलेल्या चुलत बहिणीवरच अत्याचार करण्यात आल्याची घटना जामुनझिरा येथे शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. रात्री उशिरा यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेच्या आईने या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून आरोपी रोहन बिलासिंग पावरा (20, रा.जामुनझिरा, ता.यावल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी अल्पवयीन बालिकेला केळी देण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर केळीच्या शेतात अत्याचार केला व बालिका घरी आल्यानंतर तिने आपबिती सांगितल्यानंतर यावल पोलिसात पालकांनी धाव घेतली. आरोपीविरुद्ध भाग 5 गु.र.नं.138 /2020 भादंवि 376 (फ),(ळ), 354 (अ)(ळ) 363 सह पोस्को 3 (अ) ब 4,5 (म) (न) 6,7,8, 11/12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !