वरणगावात उद्या त्रिरत्नांचे व्याख्यान


वरणगाव : जिल्हाधिकारी कांतीलाल पाटील , एसीपी मनोज पाटील, एम.पी.एसस्सी परीक्षेत यश मिळवलेल्या पूनम राणे या त्रिरत्नांचे शहरात मंगळवारी सकाळी 10 ग्रंथालय, हनुमान नगर येथे व्याख्यान होत आहे. भारतीय लोक सेवा आयोगाचा परीक्षेत कठोरा येथील कांतीलाल सुभाष पाटील हे उत्तीर्ण झाले तसेच दर्यापूर येथील मनोज प्रकाश पाटील हे 2018 मध्ये उत्तीर्ण झाले असून पिंपळगाव खुर्द येथील पूनम राणे यांनी एम.पी.एस.स्सी परीक्षेत यश प्राप्त केल्याने तीनही त्रिरत्नांचा सन्मान व त्यांच्या व्याख्यानाचे मंगळवारी शहरात आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील काळे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !