भुसावळात मास्क न लावणार्‍यांवर आजपासून धडक कारवाई


प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक : कोरोना नियंत्रणासाठी व्यापक पाऊल

भुसावळ : शहरात हजारापार कोरोना रुग्णांची संख्या गेल्यानंतर प्रशासनाने आता कोरोना नियंत्रणासाठी व्यापक पाऊल उचलले असून मंगळवारपासून मास्क न लावणार्‍यांस फिजीकल डिस्टन्स न पाळणार्‍यांवर धडक कारवाई करण्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. रामसिंग सुलाणे यांनी आढावा बैठक घेत कर्मचार्‍यांना कारवाईच्या सूचना दिल्या. शहरात प्रभाग निहाय कारवाई करण्यासाठी 24 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात पालिका कर्मचारी, शिक्षक व पोलिस असे तीन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मंगळवारपासून या पथकातील सदस्य कारवाई करणार आहेत.

जागेवर होणार पाचशे रुपयांचा दंड
शहरातील प्रत्येक भागासह भाजीबाजार, आठवडे बाजार, डेली बाजार, सराफ बाजार गांधी चौक, मॉर्डनरोड, मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यापारी संकूले आदींमधील दुकानदार, ग्राहक आदींसह नियमांचे उल्लंघण करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल तसेच फिजीकल डिस्टंन्सींग, मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणे, पाच पेक्षा अधिक जणांची गर्दी होणे अशा ठिकाणी नियम मोळणार्‍या व्यक्तीस जागेवरच 500 रुपये दंड करावा, अशा सूचना प्रांतांनी दिल्या तसेच ग्रामीण भागातही अशाच पद्धत्तीने धडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !