भुसावळ विभागात स्वच्छता अभियान
भुसावळ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात 10 ते 16 ऑगस्टदरम्यान स्वछता अभियान राबवले जाणार आहे. डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनानुसार राबवले जाणार आहे. भुसावळ विभागातील सर्व स्टेशन, बाहेरील परीसर, स्टेशन कार्यालय, ट्रॅक (विशेष लक्ष) दिले जाणार आहे. सामान्य नागरीकांनी रेल्वे स्थानकासह ट्रॅक स्वच्छ ठेवण्याचे आवाहन जनजागृती मोहिमेद्वारे केले जाईल. कोरोनाचे नियम पाळून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून हे अभियान राबवले जाणार आहे.

