वेल्हाळ्यात बिबट्याचे दर्शन : शेतकर्यांमध्ये भीती
भुसावळ : वेल्हाळे शिवारातील अॅश पॉडमधून दीपनगरकडे जाणार्या अॅश रीकव्हरी वॉटर पाईप लाइनच्या कडेला गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन घडल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभााने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वेल्हाळे परीसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला आहे.
बिबट्याच्या वावराने शेतकर्यांमध्ये भीती
गेल्या दोन दिवसांपूर्वी दीपनगरच्या अॅश वॉटर रीकव्हरी पाईप लाईनजवळ देखील शिकारीवर ताव मारताना बिबट्या आढळून आला. या परीसरातील शेतकरी, पाईप लाईनवरील सिक्युरीटी गार्ड तसेच काही युवकांनी या बिबट्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रणही केले. हा व्हिडीओ व माहिती वेल्हाळे परीसरात व्हायरल झाली. यामुळे आता शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या खरीपाच्या हंगामात शेतकर्यांना दररोज शेतात जावे लागते. पिकांच्या प्रमुख टप्प्यातील वाढीचा हा काळ आहे, याच काळात रानात बिबट्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकर्यांमध्ये भिती आहे. या प्रकरणी वनविभाग किंवा महसूल विभागाने मुक्त संचार असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे. मात्र याकडे दूर्लक्ष होत असल्याची तक्रार प्रगतीशिल शेतकरी तथा बोदवड बाजार समितीचे संचालक योगेश पाटील व शेतकर्यांनी केली आहे. या प्रकरणी तहसीलदार व वनविभागाच्या अधिकार्यांची शेतकर्यांसोबत भेट घेणार आहे.

