छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पुर्नउभारणी न केल्यास आंदोलन
बोदवडमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांचा प्रशासनाला इशारा
बोदवड : कर्नाटक राज्यातील बेळगाव मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची अवहेलना केल्याने कर्नाटक राज्यातील भाजप सरकारचा निषेध करत महाविकास आघाडी बोदवड तर्फे बोदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तर आंदोलनाचा इशारा
कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवमानकारक पद्धतीने हटविल्याने तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून कर्नाटक राज्यातील शिवरायांविरोधी भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे महाविकास आघाडीने निवेदनात म्हटले असून पुतळा पुनर्स्थापित न झाल्यास तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख गजानन घोडके, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उपप्रमुख कलीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.उद्धव पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष ईश्वर जंगले, आनंदा पाटील, नगरसेवक सुनील बोरसे, विजय पालवे, नगरसेवक सुधीर पाटील, शांताराम कोळी, संजू महाजन, हर्षल बडगुजर, सागर पाटील, नईम खान, समीर शेख, विकी शर्मा, दीपक माळी, अमोल व्यवहारे, विलास माळी, रामधन माळी, भास्कर गुरचल, गोपाल पाटील, पंकज वाघ, आयुब कुरेशी, प्रवीण लबाडे, विनोद मायकर, धनराज सुतार, अनिल पाटील, आसीफ बागवान इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

