विकासकामांना गती देण्यासाठी रीक्त पदे तत्काळ भरावीत


खासदार रक्षा खडसे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

मुक्ताईनगर : कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या विकासकामांना गती मिळण्यासाठी उपविभागीय अभियंता यांची रीक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. रावेर लोकसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगांव अंतर्गत उपविभागीय अभियंता रावेर व मुक्ताईनगर येथील पदेरीक्त असून उपविभागीय अभियंता, सावदा यांना प्रभारी नियुक्ती देण्यात आलेली आहे तसेच त्यांना कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगांव प्रभारीपदी सुद्धा जवाबदारी देण्यात आलेली आहे.

तत्काळ पदे भरण्याची केली मागणी
रावेर व मुक्ताईनगर येथील पदे रीक्त असल्यामुळे मतदारसंघातील बरीच विकासकामे खोळंबली आहे. आधीच कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागलेले असल्यामुळे तीन महिने प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांना ब्रेक लागले होते त्यामुळे रावेर व मुक्ताईनगर येथील उपविभागीय अभियंता यांची रीक्त पदे तत्काळ भरण्याबाबत तत्काळ योग्य ते आदेश होण्याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !