कोरोना बाधितांच्या अनुभवातून मिळाली प्रेरणा


भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘कोरोना भगाओ’ अभियानांतर्गत ऑनलाईन व्याख्यान मालेच्या द्वितीय पुष्पात कोरोनाबाधीतांचा अनुभव सामान्य जनतेला कळावा व त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी यासाठी भुसावळ येथील सर्जन डॉ.आशुतोष केळकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ.मनीषा दावलभक्त आणि मेडिकल व्यावसायिक हेमंत शर्मा या तीन कोरोना बाधितांचे’ मला कोरोना झाला तेव्हा’ या शीर्षकाखाली झूम अ‍ॅप आणि फेसबूक लाईव्ह या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले.

डॉक्टरांनी सांगितले अनुभव
या व्याख्यानात डॉ. दावलभक्त यांनी त्यांचा अनुभव कथन केला, तसेच कोरोना होऊ नये म्हणून, व झालाच तर काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. हेमंत शर्मा यांनी त्यांना व त्यांच्या परीवारातील सदस्यांना कोरोना झाल्यावर सरकारी उपचाराचा आलेला अनुभव तसेच तेथील चांगल्या सुविधा व त्रुटी याबाबत विचार मांडले. डॉ. आशुतोष केळकर यांनी खुमासदार शैलीत त्यांचा अनुभव कथन केला. तीनही वक्त्यांनी श्रोत्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. या व्याख्यानाचा 300 हून अधिक नागरीकांनी लाभ घेतला. डॉ.मकरंद चांदवडकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष संदीप जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शाह, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.मकरंद चांदवडकर, डॉ.नितीन दावलभक्त, एचडीएफसी बँकेचे राहुल लुंकड, विशाल कदम व सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !