किसान पार्सल रेल्वे मुजफ्फरपूरपर्यंत धावणार


गाडीच्या वेळेत रेल्वे प्रशासनाने केला बदल

भुसावळ : शेतकर्‍यांच्या मागणीवरुन देवळालीपासून दानापूरपर्यंत सुरू करण्यात आलेली किसान पार्सल रेल्वे गाडी आता मुजफ्फरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या गाडीच्या वेळेतही आता बदल करण्यात आला असून ही गाडी देवळाली येथून दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सुटणार आहे. शेतकरी व्यापारी बाजार समिती, लोडर्स यांच्या मागणीनुसार माल पाठवणे सोयीचे व्हावे, यासाठी किसान पार्सल गाडीच्या वेळेत रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे.

दर शुक्रवारी देवळालीवरून सुटणार गाडी
ही गाडी देवळाली रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सुटेल. रविवारी पहाटे 3.55 वाजेच्या सुमारास मुजफ्फरपूरला ही गाडी पोहोचणार आहे. किसान पार्सल गाडी ही नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर, खंडवा या स्थानकांवर थांबणार आहे तसेच भुसावळ विभागाव्यतिरीक्त इटारसी, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयाणराज, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, दानापूर आणि मुजफ्फरपूर येथे थांबणार आहे. अप मालगाडी मुझफ्फरपूर येथून दर रविवारी सकाळी 9.45 वाजता सुटणार आहे. ही गाडी सोमवारी रात्री 7.45 वाजता देवळाली येथे पोहोचेल. या गाडीने शेतकर्‍यांचा भाजीपाला कमी वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येणार आहे त्यामुळे शेतकर्‍यांच्या मालास योग्य भाव आणि बाजारपेठ मिळणे शक्य होणार आहे.

डाऊन मार्गावरील गाडीची थांब्याची वेळ अशी
नाशिकरोड -6.10 ते 6.30, मनमाड – 7.30 ते 7.55, जळगाव – 9.55 ते 10.15, भुसावळ – 10.45 ते 11.15, बर्‍हाणपूर – 12.5 ते 12.20(रात्री ), खंडवा- 2.10 ते 2.25



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !