अवैध धंदे बंद करण्यासाठी थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना साकडे


असलोद ग्रामस्थांचे निवेदन : राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या कारवाईकडे लागले लक्ष

शहादा : तालुक्यातील असलोद गावात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंडळ खळबळ उडाली आहे.

अवैध धंद्यांकडे यंत्रणेचे सर्रास दुर्लक्ष
गेल्या दहा वर्षांपासून ग्रामस्थ असलोद पोलिस स्टेशन पासुन ते जिल्ह्यातील वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांपर्यंत तसेच उत्पादन शुल्क विभाग, शहादा तहसील पासुन ते गृह मंत्रालयापर्यत ग्रामसभेचे ठराव व निवेदने दिली मात्र अद्यापही उत्पादन शुल्क विभागाने व पोलिसांनी असलोद गावात ढाब्याच्या नावाखाली व इतर चालणार्‍या अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाई केलीच नाही. असलोद गावात दारूबंदी व्हावी यासाठी नाशिक विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव आर.दिघावकर व नाशिक विभागीय उत्पादन शुल्क उपाायुक्त याच्याकडे दारुबंदीच्या निवेदनाची फाईल देण्यात आली आहे.



पोलिसांच्या कामकाजाबाबत आश्‍चर्य
असलोद गावात पोलिस स्टेशन असूनसुद्धा गेल्या दहा वर्षापासुन अवैध धंदे चालतात, पोलीस विभाग व उत्पादन शुल्क विभागाने आजपर्यंत ठोस कारवाई केली नसल्याचे दिसते. पोलीस स्टेशनमध्ये आजपर्यंत कार्यरत काम करणार्‍या सर्वच पोलिसांच्या व शहादा उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केल्याने याबाबत पोलिस महानिरीक्षक यांनी आश्चर्य व्यक्त केले. असलोद गावात हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली अवैध दारु विक्री होते. हे दारुबंदीच्या फाईल वरुन लंक्षात आल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ प्रतापराव आर.दिगावकर यांनी तत्काळ यावर कार्यवाही व्हावी यासाठी शहादा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये नवीन कार्यरत आय.पी.एस.पोलिस अधिकारी यांना निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेवुन त्याबाबत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या. नाशिक उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त यांनी देखील तत्काळ नंदुरबार उत्पादन शुल्क विभागाशी संपकृ साधत असलोद गावातील दारुबंदीच्या कार्यवाही बाबत माहिती जाणून घेतली. दरम्यान, पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !