भुसावळात भाऊबंदकी उफाळली : तलवारीचा वार लागल्याने एक जखमी
भुसावळ : शहरातील महात्मा फुले नगरात दोघा भावांमध्ये कौटुंबिक वाद उफाळल्यानंतर तक्रारदाराच्या पत्नीवर आरोपी तलवार उगारल्याने वार चुकवताना ती तक्रारदार भावाच्या हाताला लागल्याने शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी पसार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी चरण प्रकाश खरारे (रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या घरासमोरच आरोपी तथा भाऊ कृष्णा प्रकाश खरारे (रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) राहतात. 18 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास दोघा भावांमध्ये आपसात कौटुंबिक कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपी कृष्णा यांनी तलवार काढत ती चरण यांच्या पत्नीच्या अंगावर उगारली असता हा वार चुकवण्यासाठी चरण यांनी हात पुढे केल्याने त्यांच्या हाताला तलवार लागल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध चरण खरारे यांच्या तक्रारीनुसार भुसावळ शहर पोलिसात भादंवि 307 गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. आरोपी पसार असून त्याचा कसून शोध घेतला जता आहे. सहा.निरीक्षक संदीप डुनगहू तपास करीत आहेत.

