भुसावळात तिहेरी अपघात : दाम्पत्य किरकोळ जखमी


पत्नीच्या सतर्कतेने पतीचे वाचले प्राण : अपघातानंतर अचानक ब्रेक लावल्याने मिक्सरने दिली कारला धडक

भुसावळ : शहरात शनिवार अपघातवार ठरला. एकाचवेळी तीन अपघात झाले मात्र सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली तर एका अपघातात डंपरखाली दुचाकी आल्याने दाम्पत्य किरकोळ जखमी झाले. पत्नीने दाखवलेल्या सतर्कतेने पतीचे प्राण वाचले. तीनही अपघातप्रकरणी कुणी तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसात नोंद नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

डंपरच्या धडकेत दाम्पत्य जखमी
शहरातील अण्णाभाऊ साठे नगरातील विनोद कापसे हे पत्नीसह दुचाकी (एम.एच.19 सीएन 2492) ने सुंदरनगरकडे जात असताना
डंपर (एम.एच.19 सी.वाय.2104) त्याच दिशेने निघाला असताना दुचाकी डंपरच्या मागच्या चाकात आली. शनिवारी सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. कापसे यांच्या पत्नीने हिंमत दाखवीत पतीला ट्रकबाहेर ओढल्याने बचावले व ते किरकोळ जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती कळताच सहायक फौजदार तस्लीम पठाण, हवालदार जयेद्र पगारे, वाहतूक शाखेचे राजेद्र शिंदे, मोहंमद अली सय्यद यांनी धाव घेतली. अपघाताला कारणीभूत ठरलेला डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.


अपघातानंतर एकामागून एक धडकली वाहने
डंपरखाली दुचाकी आल्याच्या घटनेनंतर महामार्गावरील वाहनांनी अचानक ब्रेक लावल्याने महामार्ग थांबला व त्याचवेळभ भरधाव टाटा मिक्सर गाडी (एम.एच.19 सी.वाय.2946) ने पुढे थांबलेल्या स्विफ्ट कार (एम.एच.12 के.टी.5571) ला धडक दिली. मिक्स गाडी चालकाने कार चालकांना झालेल्या नुकसानीपोटी रक्कम देऊन विषय जागेवरच मिटवल्याने या अपघाताची नोंद झाली नाही. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरच बोलेरो (एम.एच.19 सी.यु.0199) व एका ट्रकचा अपघात झाला. मात्र कोणीही जखमी झाले नाही. हा
अपघातही आपसात मिटला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !