पात्र नसतांना रेशन घेतल्यास गुन्हा होणार दाखल


लाभार्थी पडताळणी मोहिम राबवण्याची यावल तहसीलदारांची तयारी

यावल : शासनाकडून कमी उत्पन्न तसेच विविध निकषांच्या आधारावर प्राध्यान्य कुटुंब, दारीद्य्र रेषेखालील कुटुंब व अन्नसुरक्षा योजनेत पात्र कुटुंबांना रास्त भावात रेशन दिले जाते मात्र. गेल्या काही महिन्यांपासुन निकषात नसताना अनेक शेतकरी व सदन कुटुंबांनी खोटे प्रतिज्ञा पत्र सादर करून रेशन घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा लाभार्थींनी स्वत:हा आपापले नाव कमी करावे अन्यथा पडताळणीत जर असे कुटुंब आढळले तर त्यांच्याकडून आजवर प्राप्त धान्य वसूल करण्यासह त्यांच्याविरूध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी सूचना तहसीलदारांनी प्रसिध्द केली आहे.

शासनाची दिशाभूल करून रेशनचा घेतला जातोय लाभ
तालुक्यात सध्या अंत्योदय कुटुंब संख्या 11 हजार 041 असून बीपीएल व अन्न सुरक्षा या प्राधान्य कुटुंबातील एक लाख 43 हजार 268 रेशन साठी पात्र नागरीक आहेत. या सर्वांना दरमहा रेशन रास्त दुकानदारांकडून वितरण केले जाते तर गेल्या काही महिन्यांपासून या लाभार्थींच्या संख्येत वाढ झाली आहे. एकूण अनेक कुटुंबीयांनी रेशनचा लाभ मिळावा म्हणून खोटे प्रतिज्ञापत्र, लाभाकरीता कुटुंब विभक्त आदी प्रकार करून शासनाची दिशाभुल करीत रेशनचा लाभ घेत असल्याचे निर्दशनास आले. याबाबत यावल तहसीलदार महेश पवार यांनी पात्र नसतांना खोटे प्रतिज्ञापत्र करून जे कोणी रेशनचा लाभ घेत असतील तर त्यांनी स्वेच्छेने आपले रेशनकार्ड पात्र यादीतून कमी करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. आता प्रशासनाकडून रेशन लाभार्थींची पडताळणी मोहिम तहसील कार्यालयाकडून राबवण्याची तयारी केली जात आहे. यात पात्र नसतांना जर कुणी लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून आजवर घेतलेले संपूर्ण धान्य प्रशासनाकडून वसुल करण्यात येणर असून सोबतच संबधीतांविरूध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येईल, असा इशारावजा सूचना पुरवठा शाखेत लावण्यात आल्या आहेत.


पडताळणीत दोषी आढळल्यास कारवाई
नोटीस प्रसिध्द करण्यात आली असून जे कुणी आजवर पात्र नसतांना धान्य घेत असतील त्यांनी स्वत:हा आपापली चूक मान्य करून कार्डावरील धान्य रद्द करण्याचा अर्ज करावा व ही एक त्यांच्यासाठी संधी असून नंतर प्रशासकीय पडताळणीत जर कोणी दोषी आढळला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार महेश पवार म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !