लग्नानंतर सहा दिवसात रफूचक्कर झालेल्या नववधूसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात


पाडळसा येथील तरुणाची दीड लाखात केली होती फसवणूक

फैजपूर : पाडळसा, ता.यावल येथील तरुणाशी लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात रफूचक्कर झालेली नववधू फैजपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून तिला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी नववधूला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रूपाली अशोक मुनेश्वर असे हॉट किती आरोपीचे नाव आहे.

लग्नाच्या सहा दिवसानंतर नववधू झाली रफूचक्कर
पाडळसा येथील प्रमोद तेली याचा विवाह 31 ऑक्टोबर रोजी झाला होता व हा विवाह अशोक कडू चौधरी (रा. कुंभारखेडा) व रेश्मा खान ऊर्फ मीना या दोघांनी दीड लाख रुपये घेऊन घडवून आणला होता मात्र अवघ्या सहा दिवसानंतर आईची तब्येत बरी नसल्याचे सांगून कथित मावस बहीण रेश्मा बरोबर गेलेली नववधू रूपाली रफूचक्कर झाली होती. त्यानंतर प्रमोद याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर अशोक चौधरी व रेशमा यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. रेशमा हिला सोबत घेऊन हवालदार सुधाकर पाटील व सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे यांनी औरंगाबाद व उमरखेड, जि.यवतमाळ येथे नववधू रूपालीचा शोध घेतला त्यानंतर मात्र रुपालीला औरंगाबाद रामनगर विठ्ठल चौक येथून ताब्यात घेण्यात आले रूपाली व तिची कथीत मावस बहीण रेश्मा या दोघांना न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, नववधू रूपाली व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखी किती तरुणांना गंडा घातला आहे ? याची माहिती चौकशीनंतर उघड होईल, असे तपास अधिकारी सुधाकर पाटील यांनी सांगितले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे व कॉन्स्टेबल सुधाकर पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !