अवैध दारू विक्री करतांना एकास अटक
भुसावळ : शहरातील सिंधी काॅलनी भागातील सुनील ऑईल मिलजवळ एका टपरीच्या बाजूला अवैधरीत्या दारू विक्री करीत असलेल्या हाेलाराम सचदेव याला पाेलिसांनी अटक केली, त्याच्याकडून ३ हजार ७४४ रूपये कींमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्यात. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी ७.५९ वाजता करण्यात आली आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहायक पाेलिस निरीक्षक कृष्णा भाेये, सहायक फाैजदार तस्लीम पठाण, रवीद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे यांनी ही कारवाई केली. हवालदार जयराम खाेडपे पुढील तपास करीत आहे.

