मुजफ्फरपुर एक्सप्रेसचा पेंटा तुटल्याने प्रवाशांमध्ये घबराट


 

शॉर्टसर्किट होऊन पेंटा कोसळला बोगीवर

भुसावळ : अप मुजफ्फरपुर- अहमदाबाद एक्सप्रेसने भुसावळ स्थानक सोडल्यानंतर ती अहमदाबादकडे निघाली असताना इंजिनपासून तिसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या बोगीवरील पेंटा ओएचईला घासला गेल्यानंतर स्वामी समर्थ मंदिराजवळ गाडी आल्यानंतर तो कोसळून गाडीवर आढळल्यानंतर गाडी जागीच थांबली व मोठा आवाज झाल्याने प्रवाशांच्या गोटात मोठा थरकाप उडाला.


साखरझोपेत असलेल्या प्रवाशांच्या गोटात उडाली खळबळ
शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अप दिशेने निघालेल्या अहमदाबाद एक्सप्रेसचे प्रवासी पहाटेच्या साखरझोपेत असतानाच गाडीचा पेंटा तुटून मोठा आवाज झाल्याने प्रवासी हादरले व नेमका काय प्रकार घडला? याबाबत एकमेकांना विचारणा करू लागले. ही घटना घडली तेव्हा चालकाने तसेच कर्तव्यावर असलेल्या रेल्वे गॅंगमन यांनी आपापल्या विभागप्रमुखांना घटना कळवताच देत तत्काळ संबंधीत विभागाची यंत्रणा तसेच रेल्वेचे अन्य विभागांचे अधिकारी दाखल झाले व त्यांनी तत्काळ पेंटा बदलण्याचे काम हाती घेतले व या कामामुळे किमान एक तास गाडीला विलंब झाला.

यांची सतर्कता आली कामी
रेल्वेची सुटल्यानंतर कर्तव्यावर असलेले युनिट एकचे गॅंगमन रशीद खान इब्राहीम खान यांनी यासंदर्भातील माहिती PWI युनूस सर, वाघमारे सर, संजय सर आदींना सूचित केले. लोहमार्गचे कर्मचारी किशोर बढे यांनी आपल्या वरीष्ठांना तसेच स्थानकावर असलेल्या सहकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !