बजेट 2021 : मद्याचा घोट महागणार !


अर्थसंकल्पाने दिला तळीरामांना मोठा झटका !

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत वित्तीय वर्ष 2021-22 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात (कृषी उपकर) 100 टक्क्यांनी वाढ केल्याने अल्कोहोलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. महसूलात वाढ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे मात्र तळीरामांना मात्र ‘महंगी हुयी शराब, थोडी थोडी पिया करो’ म्हणण्याची वेळ आली आहे.

काय होणार स्वस्त?
स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होणार
तांब्याच्या वस्तू
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू



काय महागणार?
मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढविण्यात आल्यानं मोबाइलच्या किंमती वाढणार आहेत.
परदेशातून आयात केल्या जाणार्‍या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होणार
परदेशातून आयात केले जाणारे कपडे
कॉटनचे कपडे महागणार

  • अर्थसंकल्पाशी संबंधीत बातम्या –

बजेट 2021 : आरोग्यासाठी 137 टक्के अधिक तरतूद 

बजेट 2021 : सोनं-चांदी आणखी होणार स्वस्त 

बजेट 2021 : नोकरदारांची निराशा ; इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाहीच !


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !