कोरोनाचा विस्फोट ! : पाच रुग्णांचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यात 772 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 63 हजार 422 वर : एकाच दिवसात 246 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 772 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1401 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 63 हजार 422 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 57 हजार 895 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 246 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
हे देखील वाचा : कोरोना सुसाट : भुसावळात 24 तासात 64 रुग्ण आढळले
शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 359
जळगाव ग्रामीण 23
भुसावळ 64
अमळनेर 19
चोपडा 108
पाचोरा 02
भडगाव 02
धरणगाव 24
यावल 17
एरंडोल 48
जामनेर 13
रावेर 03
पारोळा 15
चाळीसगाव 51
मुक्ताईनगर 18
बोदवड 06
अन्य जिल्हा 00

24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 66 व 69 वर्षीय पुरूषाचा, चोपडा तालुक्यातील 61 वर्षीय पुरूषाचा, धरणगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरूषाचा, भुसावळ तालुक्यातील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दोन मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव व एक मृत्यू गोल्डसिटी हॉस्पीटल व एक मृत्यू सुविधा हॉस्पीटल व एक मृत्यू चोपडा येथे झाला.
