कोरोना सुसाट : भुसावळात 24 तासात 64 रुग्ण आढळले
भुसावळ : शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात भुसावळ शहर व तालुक्यात कोरोनाचे तब्बल 64 रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून मास्क न वापरणार्यांविरुद्ध कारवाई होत असलीतरी धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आतापर्यंत 202 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहर व तालुक्यात चार हजार 930 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून त्यातील चार हजार 474 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर आतापर्यंत तब्बल 202 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर 22 रुग्णांनी कोरोनावर मात केली व आता 254 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे देखील वाचा : कोरोनाचा विस्फोट ! : पाच रुग्णांचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यात 772 रुग्ण आढळले
शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 359
जळगाव ग्रामीण 23
भुसावळ 64
अमळनेर 19
चोपडा 108
पाचोरा 02
भडगाव 02
धरणगाव 24
यावल 17
एरंडोल 48
जामनेर 13
रावेर 03
पारोळा 15
चाळीसगाव 51
मुक्ताईनगर 18
बोदवड 06
अन्य जिल्हा 00
24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 66 व 69 वर्षीय पुरूषाचा, चोपडा तालुक्यातील 61 वर्षीय पुरूषाचा, धरणगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरूषाचा, भुसावळ तालुक्यातील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दोन मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव व एक मृत्यू गोल्डसिटी हॉस्पीटल व एक मृत्यू सुविधा हॉस्पीटल व एक मृत्यू चोपडा येथे झाला.
