लेडी सिंघम वन परीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची गोळी झाडून आत्महत्या


अमरावती : रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्‍या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (28) यांनी हरीसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरूवार रात्री आठ वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे. उपवनसंराक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापुर्वी केलेल्या तक्रारी अर्जात म्हंटले आहे. हा तक्रारी अर्ज रेड्डी, अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याग्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे करण्यात आला आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा खुलासा केला आहे.

हे देखील वाचा : लेडी सिंघम वन परीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची गोळी झाडून आत्महत्या






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !