पत्नीला मारहाण करणे भोवले : पोलिस उपनिरीक्षकासह महिला कर्मचार्याचे निलंबन
औरंगाबाद : पोलिस दलातील महिलेसोबत लिव्हइनमध्ये राहणार्या पोलिस उपनिरीक्षकासह दोघांचे जिल्हा पोलिस अधीक्षक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी चौकशीअंती निलंबन केले आहे. संशयीत उपनिरीक्षकाने लिव्हइनमधील महिलेला घेवून आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. उपनिरीक्षकांच्या 35 वर्षीय पत्नीला उपनिरीक्षकासह त्यांच्या लिव्हईनमधील महिलेने घराचा कडी-कोंडा तोडून शिरून शिवीगाळ केली तसेच घरातील टीव्ही व आरसा फोडून नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चौकशी करण्यात आल्यानंतर ग्रामीण अधीक्षक कार्यालयाला अहवाल प्राप्त झाला.