धक्कादायक ! : नाशिकमध्ये ऑक्सीजन गळतीने 22 रुग्णांचा मृत्यू


जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती :  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील खळबळजनक घटना

नाशिक : ऑक्सिजनच्या टाकीला अचानक गळती होवून या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी 12 वाजता ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केल्याने उपस्थितानाही गहिवरून आले.

ऑक्सीजन गळती रोखण्यात यश
जिल्हाधिकारी मांढरे यांच्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. ही एक खाजगी कंपनीची टाकी असल्याचेही ते म्हणाले आहेत. परीस्थितीचं गांभीर्य पाहता पोलिसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.





रुग्णसंख्या वाढण्याची भीती
शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी करीत रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करीत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

हे पण वाचा : आणखी किती बळी घेणार ? भाजपा नेते प्रवीण दरेकर https://breakingmaharashtra.com/?p=27512

रस्ते बंद करण्याचे आदेश
दुर्दैवी घटनेनंतर जनतेचा संताप पाहता झाकीर हुसेन रुग्णालयाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. झाकीर हुसेन रुग्णालय कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात आले. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

ऑक्सिजन दुर्घटनेत या रुग्णांचा ओढवला मृत्यू

1) पंढरीनाथ नेरकर (37),
2) भैय्या सांडुभाई सय्यद (45)
3) अमरदीप नगराळे (74)
4) भारती निकम (44)
5) श्रावण पाटील (67)
6) मोहना खैरनार (60
7) मंशी शहा (36)
8) सुनील झाल्टे (33)
9) सलमा शेख (59)
10)आशा शर्मा (45)
11) प्रमोद वालुकर (45)
12) प्रवीण महाले (34)
13) सुगंधाबाई थोरात (65)
14) हरणाबाई त्रिभुवन (65)
15) रजनी काळे (61),
16) गीता वाघचौरे (50)
17) बापुसाहेब घोटेकर (61)
18) वत्सलाबाई सुर्यवंशी (70)
19) नारायण इरनक (73)
20) संदीप लोखंडे (37)
21) बुधा गोतरणे (69)
22) वैशाली राऊत (46)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !