बॅरीस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या निवासस्थानावर हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करावी
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) ची प्रांताधिकारी प्रशासनाकडे मागणी
भुसावळ : एमआयएमचे सर्वेसर्वा, खासदार व संसद रत्न बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एमआयएम भुसावळ युनिटतर्फे प्रांत अधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देण्यात आले. हल्ला करणार्या हल्लेखोरांना शिक्षा देण्यात यावी व ते ज्या संघटनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे त्या संघटनेची परवानगी रद्द करण्यात यावी व बॅरीस्टर असदुद्दीन ओवैसी यांना झेड प्लस सिक्युरीटी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र संयुक्त सचिव फिरोज शेख, शहराध्यक्ष मुजाहिद शेख, जळगाव जिल्हा संयुक्त सचिव कलीम शेख, जळगाव जिल्हा संयुक्त सचिव मेहमूद पठाण, तालुकाध्यक्ष शोएब बागवान, शहर उपाध्यक्ष निसार शेख, माजी तालुकाध्यक्ष अशरफ तडवी, नदीम शेख, इलियास पटेल, नावेद खान, शोएब खान व अन्य कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.
लेटर बॉम्बने खळबळ : रावेर वैद्यकीय अधीक्षकांची गडचिरोलीत बदली होण्यासाठी दिले बनावट पत्र




