पंचायत राज समिती सदस्यांनी घेतली माजी मंत्री एकनाथराव खडसेंची भेट
मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा दौर्यावर असलेल्या पंचायत राज समितीमधील सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, आमदार अमरनाथ राजूरकर यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची मुक्ताईनगर येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी एकनाथराव खडसे यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परीषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, मुक्ताईनगर गटविकास अधिकारी नागटिळक उपस्थित होते.
