कोटेचियन्स अ‍ॅल्युमिनी असोसिएशनच्या अध्यक्षपदी अनिता कोटेचा


भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या कोटेचीयन्स अल्युमिनि असोसिएशन या संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार, 26 सप्टेंबर रोजी झाली. याप्रसंगी सभेमध्ये संघटनेच्या नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्षा अनिता मोतीलाल कोटेचा, उपाध्यक्षा सीमा जगन्नाथ भारंबे, सचिव ममता चंद्रकांत पाटील, कोषाध्यक्ष राजश्री किशोर भालेराव, सदस्यांमध्ये कृपाली रमेश बर्डे, अंजुम ईस्माईल तडवी, नेहा रमेश जावरे यांचा समावेश आहे. या निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून प्रा.दीपाली पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून उपप्राचार्य वाय.डी.देसले यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी प्रा.डॉ.जान्हवी तळेगांवकर व प्रा.डॉ.राजकुवर गजरे यांनी परीश्रम घेतले. नवनिर्वाचित कार्यकारणीस प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा तसेच नॅक कोऑर्डिनेटर डॉ.जे.व्ही.धनवीज यांनी मार्गदर्शन केले. या संघटनेच्या माध्यमातून समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नवनिर्वाचित कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांचा संस्थाध्यक्षा, सचिव, पदाधिकारी तसेच प्राचार्या, उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींतर्फे सन्मान करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !