अनैतिक संबंधाचा बोभाटा : तुंबळ हाणामारीत तिघांनी गमावला जीव
नवी दिल्ली : अनैतिक संबंधामुळे तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला. झारखंडची राजधानी रांचीमध्ये ही घटना घडली. रांचीच्या मोहननगरमध्ये झालेल्या भांडणात एका सीसीएल कर्मचार्यासहीत तीन लोकांचा मृत्यू झाला तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. मोहननगर येथे राहणारा देव प्रसाद मेहरची पत्नी कौशल्यासोबत तेथीलच एक तरूण प्रकाशचे संबंध होते. मंगळवारी रात्री प्रकाश देव प्रसादच्या घरात विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी देव प्रसाद घरातच होता. प्रकाश घरात आल्यावर देव प्रसाद आणि प्रकाश यांच्यात जोरदार मारामारी झाली. ज्यात घटनास्थळीच प्रकाश आणि कौशल्याचा मृत्यू झाला. जखमी देव प्रसाद आणि त्याच्या मुलीली उपचारासाठी सीसीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान देव प्रसादचा मृत्यू झाला. मुलीच्या डोळ्यात चाकू लागला, तिच्यावर उपचार सुरू आहेत.