क्रुझवर ड्रग्ज पार्टी : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक


मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास चौकशीअंती अंमली पदार्थ नियंत्रक कक्षानं अखेर अटक केल्याने बालिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबईतील समुद्रात एका क्रुझवर आयोजित ड्रग्ज पार्टीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आर्यन खानसह एकूण तीन जणांना याप्रकरणी अटक झाली आहे. यात आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. तिघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात नेण्यात आलं आहे. वैद्यकीय चाचणीनंतर तिघांनाही किला कोर्टात हजर केलं जाईल. आर्यन खानला कोर्टात हजर केल्यानंतर एनसीबीकडून त्याची पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर एनसीबीनं सापळा रचून छापा टाकला होता. यात मोठी ड्रग्ज पार्टी उधळून लावण्यात आली आणि एकूण 10 जणांना ताब्यात घेण्यात आले. यात तीन मुलांचाही समावेश आहे. आठ आरोपींकडून चरस, एमडीएमए, एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आलं होतं.

आलिशान क्रुझवर ड्रग्ज पार्टी
समोर आलेल्या माहितीनुसार कॉर्डेलिया या 2 हजार प्रवासी क्षमतेच्या आलीशान क्रूझवर ड्रग्ज पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. याप्रकरणी आर्यन खान याचीही चौकशी केली गेली. ड्रग्ज पार्टीशी आर्यन खान याचा काय संबंध होता याबाबत त्याची चौकशी करण्यात आली.





मुलीची छेड काढण्यावरून जळगावात दोन गटात तुंबळ हाणामारी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !